Police Crackdown in Nashik Saam
महाराष्ट्र

शिंदेसेनेचा नेता पोलिसांच्या रडारवर, घरावर टाकला छापा; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच कारवाई

Police Crackdown in Nashik: मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर. त्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई. राजकीय गुडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Bhagyashree Kamble

  • फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याआधी पोलिसांची मोठी कारवाई.

  • भाजप नेते मामा राजवाडे ताब्यात.

  • पवन पवार फरार.

  • पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याआधी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय गुडांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करणारे मामा राजवाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच शिवसेना शिंदे गटातील कुख्यात गुंड पवन पवार देखील नाशिक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

पवन पवार आणि विशाल पवार सध्या फरार आहेत. पवन पवार सध्या पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी पवन पवार यांच्या घरावर छापा टाकला. पवन पवार याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. यासह होर्डिंगप्रकरणीही दोघांवर गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत पवन आणि विशाल पवार दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पवन पवार आणि विशाल पवार यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर आणि घरावर पोलिसांनी आज छापा टाकला. उत्सव काळात परिसरात दहशत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी परिसरात बॅनरबाजी केली होती. त्याअनुषंगाने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फौजदारी क्रिमिनल अमेनमेंट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जेलरोड परिसरात विनापरवानगी स्वागत कमानी आणि डिजिटल होर्डिंग उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, तसेच सर्व सामान्यांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पवन पवार यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT