Nashik police bulldozers demolishing a gangster’s illegal three-storey building during crackdown operation. Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Police Bulldozer Action:नाशिकमध्ये 'उत्तर प्रदेश' पॅटर्न, बड्या राजकीय नेत्याचं साम्राज्य जमीनदोस्त; कारण काय?

Nashik Gangster Prakash Londhe Arrested After Shooting Incident: उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही बुलडोजर पॅटर्नची चर्चा रंगलीय.. आता पोलिसांच्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.. कारण थेट गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्यासाठी पोलिसांनी बुलडोजर कारवाईला सुरुवात केलीय... मात्र ही कारवाई कुठे सुरु करण्यात आलीय?

Omkar Sonawane

ही दृश्य योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातील नाहीयेत.. तर ही दृश्य आहेत गुन्हेगारांचं काळं साम्राज्य उद्ध्वस्त करणाऱ्या नाशिकमधील बुलडोजर कारवाईची..

नाशिकमध्ये गुन्हेगारांनी हैदोस घातलाय.. हत्या, खंडणी, गोळीबार, ड्रग्जची तस्करी यांनी नाशिक हादरुन गेलंय.. सामान्य नागरिक गुन्हेगारांच्या दहशतीखाली आहे... त्यातच आता नाशिक पोलिसांनी योगींच्या बुलडोजर पॅटर्न प्रमाणेच नाशिकमधील गुन्हेगारांविरोधात बुलडोजर चालवायला सुरुवात केलीय... आणि त्याला कारण ठरलंय.. सातपूर भागात प्रकाश लोंढे या गुन्हेगाराने केलेला गोळीबार... गोळीबारानंतर नाशिक पोलिसांनी थेट प्रकाश लोंढे आणि मामा राजवाडेंच्या मुसक्या आवळल्या...आणि त्यानंतर नाशिक पोलीस आणि महापालिकेने थेट प्रकाश लोंढेच्या अनधिकृत तीन मजली इमारतीवर हातोडा चालवलाय..

एवढंच नाही तर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे त्यांच्याकडून वदवून घेतलंय..

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आणि अट्टल गुन्हेगारच नाही तर सोशल मीडियावर भाईगिरीचे रील्स बनवणाऱ्यांनाही चांगलाच दणका दिलाय.. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा हा गुन्हेगारांच्या अनधिकृत साम्राज्याकडे वळवला असला तरी बुलडोजरची कारवाई करताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचं पालन करायला हवं.. अन्यथा उत्साहाच्या भरात केलेल्या कारवाईची किंमत जनतेच्या पैशातून मोजावी लागू शकते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT