Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : दांडिया खेळण्यावरून तरुणाला बेदम मारहाण; तरुणाची प्रकृती चिंताजनक, घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik News : ज्या ठिकाणी एका तरुणाला सात ते आठ जणांच्या टोक्यांनी कोयता आणि दांडुक्यानी मारहाण केली होती. त्याच परिसरात अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नवरात्र असल्याने जिकडे तिकडे गरबा- दांडिया खेळण्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दांडिया खेळण्यावरून एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  

नाशिकच्या (Nashik) सातपूर परिसरात असलेल्या श्रमिक नगर परिसरात श्रमिक नगर मित्र मंडळाच्या दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. दरम्यान याठिकाणी आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. अक्षय शाहू असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जत आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

ज्या ठिकाणी एका तरुणाला सात ते आठ जणांच्या टोक्यांनी कोयता आणि दांडुक्यानी मारहाण केली होती. त्याच परिसरात अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याबाबत सातपूर (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहे. मारहाण कशामुळे झाली याचे नेमके कारण समजलं नसून किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT