Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: भोंदूबाबाकडून महिलेवर मायाजाल; सोन्‍याची पोत घेऊन झाला पसार

भोंदूबाबाकडून महिलेवर मायाजाल; सोन्‍याची पोत घेऊन झाला पसार

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : बसस्‍थानक परिसरात असलेल्‍या दुकानात भोंदूबाबा आला. त्‍याने महिलेला पुजा करायचे नाव सांगून पिशवीत सोन्‍याची पोत ठेवण्यास सांगितले. महिलेने असे केल्‍यानंतर भोंदूबाबा तेथून पसार झाला. याबाबत (Police) पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

नाशिकच्या येवला तालूक्यातील दरसुल येथील मधूमती रविंद्र शिंदे या महिला बसस्थानक परिसरात किराणा दुकान चालवित असतात. आज सकाळच्‍या सुमारास ग्राहक म्हणून आलेल्या एका भोंदुबाबाने त्यांना आपल्या जाळ्यात ओढत मला पुजा करायची आहे; असे सांगत खिशातून पैसे महिलेकडे दिले. हे पैसे तुमच्या गळ्यातील सोन्याच्या (Gold) पोतीला स्पर्श करुन दान पेटीत टाका. असे सांगून प्लास्टिक पिशवीत असलेल्या फुलांच्‍या बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले.

पिशवी देवून पसार

यानंतर दुकानात आलेला हा भोंदू तेथून पसार झाला. जेव्हा महिलेने प्लास्टिक पिशवी तपासली. तेव्हा त्यांची पोत गायब झाल्‍याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडा-ओरड केली. मात्र ठग कुठेच दिसला नाही. अखेर येवला तालूका पोलिसात अज्ञात ठगा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाण्याच्या वर्चस्वावरुन महायुतीत मतभेद, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात पुन्हा संघर्ष

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात फक्त मराठी चालणार; मुंबईत दहीहंडी उत्सवात मनसेचे बॅनर झळकले

Irfan Pathan : कुत्र्याचं मांस खाल्ल असल्याने...; विमानात इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदीमध्ये राडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

SCROLL FOR NEXT