Woman Delivery In Running Train Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती; गोंडस बाळाला दिला जन्म

Woman Delivery In Running Train gave birth to child : नाशिकमधून धावत्या रेल्वेत महिलेची प्रसुती झाल्याची बातमी समोर आलीय. महिलेने ट्रेनमध्येच बाळाला जन्म दिल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या महिलेने रेल्वेतच मुलाला जन्म दिल्याची घटना आज घडलेली आहे. धावत्या रेल्वेतच महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिने रेल्वेमध्येच एका गोंडळ बाळाला जन्म दिलाय. नाशिक स्थानकादरम्यान ही घटना आज सकाळच्या सुमारास घडलेली आहे. या घटनेबाबत सविस्तर आपण जाणून घेवू या.

कशी घडली घटना?

या महिलेचं नाव रिफा असं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, रिफा तिच्या नातेवाईकांसोबत मुंबईहून गोरखपूरला (Nashik News) निघाली होती. परंतु इगतपुरी सोडल्यानंतर रिफा यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या होत्या. अचानक गाडीमध्ये वेदना सुरू झाल्याने मात्र मोठा गोंधळ उडाला होता. परंतु गाडीमध्ये कुठेच थांबा घेणार नव्हती. रेल्वे थेट नाशिकरोड येथे थांबणार होती. परंतु ट्रेनमधील इतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी मदतीला धावले.

धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती

प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना कळवत पुढे स्थानिक डॉक्टर आणि आरोग्याची यंत्रणा तयार ठेवली (Woman Delivery In Running Train) होती. देवळाली कॅम्प हे स्थानक सोडताच महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नाशिकरोड स्थानकामध्ये गाडी पोहोचतात या महिलेसह बाळाला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात (Nashik News In Marathi) आलंय. कृषीनगर एक्सप्रेसमध्ये सर्वसाधारण डब्यातच या महिलेची प्रसुती झाल्याचं समोर आलंय.

प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी मदतीला धावले

रेल्वेमधील इतर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मदत केल्यामुळे या महिलेच्या कुटुंबीयांची मोठी मदत झालीय. त्यांनी रेल्वे प्रशासनाचे मदतीबद्दल आभार मानले आहेत. महिलेला धावत्या रेल्वेमध्येच वेदना सुरू झाल्या (Train gave birth to child In Railway) होत्या. त्यानंतर ट्रेनमध्येच तिने बाळाला जन्म दिल्याचं समोर आलंय. सध्या हा विषय खूप चर्चेचा बनलेला आहे. मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या कृषीनगर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT