Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाग्या-साक्या धरणातून पाण्याची होतेय चोरी

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील पुर्व भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे नांदगाव तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे धरण देखील भरले नाहीत. परिणामी पाण्याची समस्या जाणवत आहे. अशाच प्रकारे (Nashik) नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणात पाणीसाठा मुबलक नाही. असे असताना देखील नाग्या- शक्य धरणातून मोटारी लावून पाणी चोरी केले जात असल्याचे समोर आले आहे.  (Latest Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील पुर्व भागात यंदा अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे (Nandgaon) नांदगाव तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातही लघू प्रकल्प असलेल्या नाग्या-साक्या धरणाचा पाणी साठा शून्य असतांना डेड वॉटरमधून दुष्काळग्रस्त गाव, वाड्यांना तेथून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शिवाय या परिसरातील अनेक शेतकरी (Farmer) धरणात मोटारी टाकून आपल्या शेतात पाणी घेऊन जात असतात. मात्र यंदा धरणात पाणीच साचलेले नाही. त्यामुळे धरणात मोटरी टाकून शिल्लक पाणी साठा वापरत असून उघडपणे पाणी चोरी होत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकाराकडे मात्र ना विज मंडळाचे लक्ष ना प्रशासनाचे लक्ष असून जेथून पिण्याचे टँकर भरले जातात. तोच साठा संपुष्ठात आला तर उन्हाळ्यात नेमके गावांना, वाड्यांना पाणी कुठून पुरवायचे? असा प्रश्न निर्माण होणार असल्याने प्रशासनाने तातडीने पाण्याची होणारी चोरी रोखावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT