Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; सरपंचासह सदस्यांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे संकट (Water Scarcity) आतापासून निर्माण झाले असून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशाच प्रकारे नाशिक जिल्ह्यातील सुरेगाव रास्ते या गावात पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ (Nashik) आक्रमक झाले असून त्यांनी सरपंचासह सदस्यांना ग्रामपंचायत कार्यलयात कोंडून ठेवले. (Live Marathi News)

नाशिक जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहे. यात येवला तालूक्यातील सुरेगाव रास्ते या गावात ग्रामपंचायतीकडून (Grampanchayat) महिन्यातून केवळ दोन वेळेस पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे गावात पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे. पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यामुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. तर संतप्त नागरिकांनी यावेळी ग्रामपंचायतमध्ये (Sarpanch) सरपंचासह सदस्यांना कोंडत ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक दिवसाआड पाणी मिळावे 

ग्रामपंचायतीला पाण्यासाठी आलेल्या निधीतून (Water Crisis) पाणी पुरवठ्याची कामे न करता बिल काढण्यात आल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने एक दिवसाआड पाणी द्यावे; अशी मागणी करण्यात आली अन्यथा ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : हर्षवर्धन पाटलांनंतर आता रामराजे तुतारी हाती घेणार? मोठी अपडेट आली समोर

Madhabi Puri Buch : ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्या अडचणीत वाढ, हिंडेनबर्गच्या आरोपांची होणार चौकशी

Bigg Boss 18 : 'बिग बॉस'च्या प्रोमोचा व्हिडिओ आला; सलमान खानचं 'भविष्य' दिसलं!, VIDEO बघा

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT