Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : वंचितचे उमेदवार शिंदे यांच्या गाडीला अपघात; घातपात असल्याचा केला आरोप

Nashik News : अविनाश शिंदे हे रात्री आपल्या वाहनाने प्रचाराला जात असताना त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राज्यात कालपासून अनेक घटना घडामोडी घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याचा दरम्यान नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मात्र हा घातपात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत आता चुरस वाढली आहे. प्रचार थांबल्यानंतर उमेदवार केवळ गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. तर प्रचार संपल्यानंतर रात्री उमेदवार मतदारसंघातून घराकडे परतले. याच दरम्यान (Nashik News) नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश शिंदे हे रात्री आपल्या वाहनाने प्रचाराला जात असताना त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने मागून धडक (Accident) दिली. यात शिंदे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.  

दरम्यान प्रचाराला जात असताना मागच्या बाजूने एका अज्ञात वाहनाने शिंदे यांच्या गाडीला धडक दिल्याची त्यांची तक्रार आहे. यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप अविनाश शिंदे यांनी केला आहे. सदर अपघातात शिंदे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना लागलीच नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT