Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : आई घरकामात व्यस्त, अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज अचानक बंद, बाहेर येऊन बघताच अनर्थ; नाशकात हळहळ

Nashik News : खामखेडा गावातील कोळी वाडा वस्तीत आकाश सोज्वळ हे परिवारासह वास्तव्यास आहे. दरम्यान सकाळी आई घरात काम करत होती तर मुलगी देवांशी अंगणात खेळत होती. खेळत असताना देवांशी पाण्याच्या टाकीजवळ गेली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

देवळा (नाशिक) : नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा येथे आज सकाळच्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे. घराच्या अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेने सोज्वळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा गावात सकाळी घडलेल्या घटनेत देवांशी आकाश सोज्वळ (वय २) असे मृत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. खामखेडा गावातील कोळी वाडा वस्तीत आकाश सोज्वळ हे परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांना दोन वर्षाची देवांशी मुलगी होती. दरम्यान सकाळी आई घरात काम करत होती. तर मुलगी देवांशी हि अंगणात खेळत होती. खेळत असताना देवांशी पाण्याच्या टाकीजवळ गेली असता त्यात ती पडली. 

मुलीचा आवाज न आल्याने आई आली बाहेर 

आई घरकामात व्यस्त असताना, देवांशी कधी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीकडे गेली हे कोणालाच समजले नाही. दरम्यान थोड्याच वेळात मुलीचा आवाज न आल्याने आईने तिला आवाज देत शोध घेतला, मात्र ती मुलीचा आवाज येत नसल्याने आईने शोधाशोध केली असता देवांशी हि घराजवळच्या पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. तिच्या आईने जोरात अरोड्या मारत लागलीच देवांशीला बाहेर काढले. 

आईचा एकच आक्रोश 

आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर देवांशी हिला तातडीने खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणी केली असता वैद्यकीय यांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूने आईने एकच आक्रोश केला, तर दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूने खामखेडासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT