Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: भरदिवसा लुटीच्‍या उलगड्याने पोलिसही अवाक; नाशिकमधील लुटीचे सत्‍य आले समोर

भरदिवसा लुटीच्‍या उलगड्याने पोलिसही अवाक; नाशिकमधील लुटीचे सत्‍य आले समोर

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक रोड : विहितगाव परिसरातील भरदिवसा झालेल्या लुटीच्या घटनेचा अवघ्या दोन दिवसात उलगडा करण्यात नाशिकरोड (Nashik) पोलिसांना यश आले. कर्जदारांच्या तकाद्याला वैतागून फिर्यादीनेच लुटीचा बनाव रचल्याचे चौकशीत समोर आले. (Tajya Batmya)

देवळाली गावात अशपाक खाटीक याचे मोहम्मदीया चिकन सेन्टर असून बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुचाकीने जात असताना विहितगाव सिग्नलजवळ बिना नंबरच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी त्याची दुचाकी (Crime News) अडवली. धारदार शस्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील एक लाख तीन हजार रुपये आणि दुचाकी घेऊन पोबारा केला. आधीच वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकरोड पोलिसांसमोर आव्हान उभे केलेले असताना त्यात या घटनेने भरच घातली होती.

तपासात काहीच आले नाही समोर

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या विहितगाव परिसरातील सिग्नल जवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण अशपाक म्हणतो त्याप्रमाणे काहीच आढळले नाही. घटनेबाबत परिसरातील नागरिकांकडे विचारपूस केली; तेव्हा त्यांनीही ना कोयत्याने धाक दाखवला गेला, ना लुटीची घटना घडली, असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अशपाक यास ताब्यात घेऊन त्यास बोलते केले.

अन्‌ त्‍याने दिली कबुली

आपल्यावर खूप कर्ज झाले असून कर्जदार पैशांसाठी सारखे तकादा लावत आहेत. त्यामुळे आपणच हा लुटीचा बनाव रचला कारण आपण संकटात असल्याचे बघून तरी कर्जदार काही दिवस थांबतील, असे अशपाकने पोलिसांकडे कबुल केले. या आधारे फिर्यादीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात DJ विरोधात आज ‘मूक मार्च’काढण्यात येणार

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Manache Ganpati : बाप्पाच्या आगमनाची वेळ ठरली! पुण्यातील मानाचे ५ गणपती कधी विराजमान होणार? वेळ आणि पथकांची यादी एका क्लिकवर

Nerul Tourism : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

SCROLL FOR NEXT