Measles Disease Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिककरांची चिंता वाढवणारी; ४ बालकांमध्ये आढळली गोवरची लक्षणं

नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवरने शिरकाव केला आहे.

अभिजित घोरमारे

Nashik News : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई मालेगाव पाठोपाठ आता नाशिकमध्येही गोवरने शिरकाव केला आहे. शहरात गोवरचे ४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या चारही संशयित रुग्णांमध्ये बालकांचा समावेश आहे. शहरात अचानक गोवरने शिरकाव केल्याने महापालिका आरोग्य विभाग अलर्टवर आलाय. चारही बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये सुरू असलेली गोवरची साथ मालेगाव शहरापर्यंत पोहोचली होती. मालेगाव शहरातील ४४ लहान मुलांना गोवर साथीच्या आजाराने ग्रासले असून ते महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आता मालेगावपाठोपाठ नाशिकमध्येही चार बालकांना गोवरची संशयित लक्षणे दिसून आली आहे.

या चारही बालकांच्या रक्ताच्या नमुन्यांच्या अहवाल आल्यानंतर शहरात बालकांची स्वतंत्र तपासणी मोहीम राबवण्याची आरोग्य विभागाने तयारी केली आहे. ज्या बालकांना गोवर प्रतिबंधक लसीकरण झालेले नसेल त्यांना संबंधित पालकांनी तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नाशिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत गोवरने घेतला दहावा बळी

मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव कायम असून गोवरने आणखी एक बळी घेतला आहे. गोवंडीतील एका सव्वा वर्षाच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत गोवरने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १० वर पोहचली आहे. सोमवारी मुंबईमध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले असून, रुग्णांची संख्या २०८ झाली आहे. तसेच सोमवारी २२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Physical Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शकाला दिलासा; कोर्टाकडून 'या' अटींसह अंतरिम जामीन

Beed : बीडमध्ये पुन्हा हाणामारी! गुंडांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, हॉटेलचीही केली तोडफोड

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात, बसने दुचाकीला चिरडलं; तरुणाचा जागीच मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO

Pune Ring Road : पुणेकरांची वाहतूककोंडीची कटकट संपणार! रिंग रोडच्या कामाला सुरूवात, वाचा कसा असेल मार्ग, किती वेळ वाचणार?

Visakha Subhedars Son: कुवेतमध्ये अडकलेला विशाखा सुभेदारचा मुलगा अखेर मुंबईत परतला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

SCROLL FOR NEXT