Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: साखर झोपेत मृत्‍यूने गाठले; लाकडी कपाट पडल्‍याने चिमुकल्‍याचा मृत्‍यू

साखर झोपेत मृत्‍यूने गाठले; लाकडी कपाट पडल्‍याने चिमुकल्‍याचा मृत्‍यू

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक सिडको : अपघात केव्हा कधी आणि कसा होईल याचा काही नेम नाही. परंतु काही अपघात असे असतात जे मनाला (Nashik News) चटका लावून जातात. असाच एक प्रसंग बुधवारी जाधव संकुल परिसरामध्ये साखर झोपेत असणाऱ्या शौर्यच्या बाबतीत घडला आहे. या तीन वर्षीय चिमुकल्‍याचा झोपेतच दुर्देवी (Death) मृत्‍यू झाला. (Live Marathi News)

नाशिक सिडको परिसरातील शौर्य आणि त्याचे कुटुंबीय झोपेत असताना सकाळी सुमारे साडेसहा वाजता अवघा तीन वर्षाच्या शौर्य सुजित विश्वकर्मा याच्या अंगावर लाकडी कपाट पडलेल्याने त्याचा जागीच अंत झाला. सदरची बाब परिसरात समजतात एकच शोककळा पसरली. मुलाच्या पालकांवर आभाळ कोसळल्यासारखं झाल.

मुलगा जिवंत असल्‍याची वेडी भावना

आपला पोटचा मुलगा जिवंत असेल; अशी वेडी भावना घेऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्यास उपचारासाठी दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शोर्य यास तपासून मृत घोषित केले. यानंतर त्याच्या पालकांनी एकच हंबरडा फोडला. अंबड परिसरातील जाधव संकुल येथे राहणाऱ्या विश्वकर्मा परिवारावर या प्रसंगामुळे मोठी शोककळा पसरली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT