Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : पाच लाखांचे दागिने चोरी; दोघा सराईतांना नाशिक पोलिसांना घेतले ताब्यात

Nashik News : जामनेर येथे वास्तव्यास असलेले भाऊराव घाटे हे रक्षाबंधनानिमित्ताने नाशिकच्या शिवाजीनगर येथे राहणाऱ्या भाच्याकडे गेले होते

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकला भाच्याच्या घरी पाहुणा म्हणून गेलेल्या एका व्यक्तीचे तब्बल पाच लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात दाखल तक्रारीवरून दागिने चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना नाशिक पोलिसांनी अटक केली. गंगापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

भारत खरात व महेश शिरसाठ अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. दरम्यान जामनेर येथे वास्तव्यास असलेले भाऊराव घाटे हे रक्षाबंधनानिमित्ताने नाशिकच्या (Nashik) शिवाजीनगर येथे राहणाऱ्या भाच्याकडे गेले होते. यावेळी सोबत त्यांनी सोन्याचे दागिने देखील आणले होते. मात्र भारत व महेश यांनी पाच लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी केले होते. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच भाऊराव घाटे यांनी पोलिसात तक्रार दिली. 

पोलीस पथक (Nashik Police) या गुन्ह्याचा तपास करत असतांना संशयित खरात हा जुन्नर (पुणे) येथे मिळून आला. त्याच्या चौकशीत महेश शिरसाठ याचे नाव समोर आले. त्याला देखील संगमनेर येथून अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोघांकडून ५ लाख ३६ हजाराचे दागिने हस्तगत करण्यात आली. संशयितांकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT