Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखासह सहा माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून मनमाडचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर देखील राजकीय घडामोडी सुरूच असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. अनेक राजकीय पदाधिकारी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. यातच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह सहा माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 

नाशिकमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून मनमाडचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. सहा माजी नगरसेवकांसह धात्रक यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विजय चौधरी, मंत्री जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादी शहराध्यक्षानीही सोडला पक्ष 

गणेश धात्रक यांच्यामुळे मनमाड, नांदगाव परिसरात ठाकरे गटाची ताकद वाढलेली होती. मात्र त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला निश्चितच मोठा धक्का मानला जात आहे. तर धात्रक यांच्यासमवेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक गोगड यांनीही भाजपात प्रवेश केला.

नांदगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढणार 

गणेश धात्रक हे गेल्या तीस वर्षांपासून मनमाड नगरपालिकेत नगरसेवक आहेत. तर दोन वेळेस त्यांनी मनमाडचे नगराध्यक्ष पदही भूषविले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नांदगाव मतदार संघातून ठाकरे गटाचे उमेदवार होते. धात्रक यांच्या प्रवेशाने नांदगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढणार आहे. तसेच राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT