Trimbakeshwar Dog Attack Saam Tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, १० जण जखमी

Trimbakeshwar Dog Attack: त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दर्शन रांगेमध्ये उभे असताना कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Priya More

त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरामध्ये भीतीचे वातावरण होते. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने १० जणांना चावा घेतला. रविवारी संध्याकाळी मंदिराच्या दर्शन रांगेत उभे असताना कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये ५ मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारााठी दाखल करण्यात आले.

पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्यानं काही काळ मंदिर परिसरात भीतीचे वातावरण होते. जखमी झालेल्यांमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महत्त्वाची बैठक

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT