मनासारखं शिक्षण घेता येईना; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल   Saam TV
महाराष्ट्र

मनासारखं शिक्षण घेता येईना; एसटी कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल

मुलावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अभिजीत सोनावणे

नाशिक: मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मालेगाव आगाराचे चालक शिवदास शिंदे यांच्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं मालेगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वडिलांना कमी पगार मिळत असल्यानं हवं ते शिक्षण घेता येत नसल्यानं मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पोलीस चौकशीनंतरचं कारण स्पष्ट होणर आहे.

मालेगावात काही एसटी कर्मचाऱ्यांचं आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अद्याप सुरूच आहे. एसटी सेवा सुरू असली, तर काही प्रमाणात एसटी सेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभरात आदोलन सुरु आहे. पगार, बोनस त्याचबरोबर सरकारी कर्मचारी म्हणून रुजू करुन घ्या अश्या काही मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. अगोदर आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होताना पाहिल्या आता ती धग एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाजवळ गेली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Maharashtra News Live Update: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, शेतकऱ्याने बांध पेटवून दिला

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT