Saptshrungi Devi Saam tv
महाराष्ट्र

Saptshrungi Devi : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी आनंदाची बातमी; मंदिर रात्री १२ पर्यंत राहणार खुले

Nashik News : दिवाळी सुट्यांमध्ये फिरायला जात साडेतीन शक्तिपीठांतील आद्यपीठ असलेल्या वाणीच्या गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. या गर्दीत सर्व भाविकांना दर्शन घेणे शक्य होत नाही

अभिजीत सोनावणे

नाशिक : दिवाळी उत्सव साजरा झाल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सप्तशृंगी देवीचे मंदिर २२  ऑक्टोबरपासून रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी सोयीचा ठरणार आहे. 

दिवाळी उत्सवानिमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. दरम्यान दिवाळीनिमित्ताने असलेल्या सुट्यांमध्ये फिरायला जात साडेतीन शक्तिपीठांतील आद्यपीठ असलेल्या वणीच्या गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यामुळे या गर्दीत सर्व भाविकांना दर्शन घेणे शक्य होत नाही. यामुळे मंदिर संस्थानने मंदिर रात्री १२ वाजेपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंधरा दिवस रात्रीपर्यंत मंदिर राहणार खुले 

दिवाळीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आलेल्या प्रत्येक भाविकाला देवीचे दर्शन घेता यावं यासाठी निर्णय घेण्यात आला असून २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री १२ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. मंदिर पहाटे ५ ते रात्री १२ पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रोप वे ट्रॉलीची सुविधा देखील पहाटे ५ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित; भाविकांची मोठी गर्दी
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात काकडा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. नरक चतुर्दशीपासून पुढील १५ दिवस येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे हा काकडा सोहळा साजरा केला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील काकडा सोहळा म्हणजे दिवाळी ते कार्तिक पौर्णिमा काळात रोज पहाटे केला जाणारा एक विधी आहे. या सोहळ्यात, पहाटे ३ वाजता घंटानाद सुरू झाल्यावर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि पुजारी मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत अर्थात काकडा प्रज्वलित करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Land Record: आता तुमच्या जमिनीचेही असणार आधारकार्ड; नकाशा, नोंदणी अन् कोर्ट केसची माहिती मिळणार एकाच ठिकाणी

पानटपरीच्या आड भलताच धंदा; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईतील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर, आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, बाळंतिणीला झोळीचा आसरा

Health Tips : खूप उशीर एकाच जागी बसल्याने शरीरात काय बदल होतात?

निधीमुळे अडले, आमदार मंत्र्यांसमोरच रडले, निधीवाटपावरून भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष

SCROLL FOR NEXT