Nashik News  Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक मध्यच्या जागेवरून अजूनही संभ्रम; उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता

Nashik News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो कि महायुती असो दोघांमध्ये बंडखोरी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून काँग्रेस आणि उबाठा गट शिवसेनेमध्ये वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस व उबाठाच्या इच्छुक उमेदवांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो कि महायुती असो दोघांमध्ये बंडखोरी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जागा वाटपावरून नाराजीनाट्य पाहण्यास मिळत असल्याने पक्षांकडून उमेदवारी दिल्यानंतर देखील मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी केली जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. हेच चित्र (Nashik News) नाशिक मध्यमध्ये महाविकास आघाडीत पाहण्यास मिळत असून यातून बिघाडी होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 

मध्य नाशिकमधून उबाठा गटाचे माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आल्याने काँग्रेसमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर (Congress) काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या हेमलता पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने आदेश दिला तर मैत्री पूर्ण लढत करू, अन्यथा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडी बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP Star Campaigners: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ठरले, अजित पवारांसह ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

Maharashtra News Live Updates : कल्याण पूर्वेत महायुतीत बंडखोरी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी भरला अपक्ष फॉर्म

Mahim Constituency : अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,' छत्रपती लढले अन् जिंकले'

Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

VIDEO : उद्धवसेनेला मोठा धक्का, किशनचंद तनवाणी यांनी घेतली माघार; मोठं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT