Ladki Bahin Yojana News Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : पोस्ट खात्यातील पैसे संपले; लाडक्या बहिणींना पहावी लागतेय वाट

Nashik News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते अशा अनेक महिलांनी पोस्टात, बँकेत आपली खाती उघडली आहेत

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. मुळात हा लाभ घेण्यासाठी महिलांनी नवीन खाते उघडले आहेत. अनेकांनी पोस्टात खाते उघडले असून पैसे काढण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होत असून पोस्टात देखील गर्दी असून महिलांना खात्यातील पैसे देण्यासाठी पोस्टाकडे रक्कमच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे महिलांना ताटकळत राहावे लागत आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते अशा अनेक महिलांनी पोस्टात, बँकेत आपली खाती उघडली आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरवात झाल्यानंतर अनेकांचे पैसे खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे काढण्यासाठी देखील महिलांच्या बँक व पोस्टाच्या बाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यानुसार (Nashik) नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आंबसन गावातील महिला पोस्टात पैसे काढण्यासाठी गेल्या असता पोस्टात पैसेच शिल्लक नसल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळाले. 

इतकेच नाही तर अंबासन येथील पोस्ट कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची हेळसांड होत असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. पोस्टात पैसे शिल्लक नसल्याने खात्यातून रक्कम काढण्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींना ताटकळत बसावे लागते आहे. आता पोस्टाकडे कधी पैसे येतील व त्यातून कधी वाटप होईल याची प्रतीक्षा लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT