Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; २० जण जखमी

Nashik News : नवस फेडण्यासाठी भाविक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत नवस फेडण्यासाठी गडावर जात असतात. त्यानुसार आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग गडावर जाण्यासाठी निघाले

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले. या अपघातात गाडीत बसलेले २० भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

वणी- नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गडावर दर्शनासाठी आजही भाविक मोठ्या संख्येने जात आहे. तर काही भाविक हे वेगवेगळे नवस मानत असतात. नवस फेडण्यासाठी भाविक सप्तशृंगी देवीचे दर्शन घेत नवस फेडण्यासाठी गडावर जात असतात. त्यानुसार आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग गडावर जाण्यासाठी निघाले होते. 

वळण रस्त्यावर चालकाचा अंदाज चुकला 

दरम्यान सकाळी गावातून नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झाले होते. तर नांदुरी गड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. वणी- नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून उलटले. यामुळे गाडीत बसलेले २० भाविक जखमी झाले आहेत. 

गंभीर जखमींना नाशिकला हलविले 
भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी आहेत. यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी लागलीच मदत करत जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

SCROLL FOR NEXT