Yewla Nagarpalika Saam tv
महाराष्ट्र

Yewla Nagarpalika : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अनोखा फंडा; नगरपालिकेची बँण्ड बाजा बजाओ मोहीम

Nashik News : नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या वतीने धडक वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष समाप्तीवर असताना नागरिकांकडून कर भरणा केला जात नाही.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मार्च एन्डिंग असल्याने महापालिका, नगरपालिकेकडून मालमत्ता कराची थकीत रक्कम वसुली केली जात (Nashik) आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा ते बाराच दिवस राहिल्याने वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यासाठी येवला नगरपालिकेने अनोखी शक्कल लढवत बॅण्ड बाजा बजाओ मोहीम राबविली जात आहे. याद्वारे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या वतीने धडक वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष समाप्तीवर असताना नागरिकांकडून (Tax) कर भरणा केला जात नाही. यामुळे शहरातील गाळेधारक, नळपट्टी, घरपट्टी, जागा भाडे अशा थकबाकीदारांच्या घरासमोर बँण्ड बाजा वाजविण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. नगर पालिकेच्या वसुली पथकाने शहरातील विविध भागात जाऊन बँन्ड वाजवत मालमत्ता धारकांनी मुदतीत थकीत कर भरण्याचे आवाहन केले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नळ कनेक्शनही कापले 

नगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या कर वसुली मोहिमेत पालिका कर्मचाऱ्यांकडून कारवाई देखील केली जात आहे. यात ज्यांची थकबाकी आहे, अशा नळपट्टी धारकांचे कनेक्शन सुध्दा तोडण्यात येत आहे. थकबाकी भरणा केल्यानंतर पुन्हा नळ कनेक्शन जोडणी केली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

SCROLL FOR NEXT