Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Nashik News : मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : दुधात भेसळ करून विक्री करत जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यात समोर आला आहे. दूध डेअरीमध्ये मिल्क पावडर कॉस्टिक सोड्याचा वापर करून भेसळयुक्त दूध (Milk) तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. (Live Marathi News)

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या मिरगाव येथील एका दूध डेअरीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवण्यात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Police) ओम सद्गुरु दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला. या दरम्यान चक्क भेसळयुक्त दूध बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

दोन संशयित ताब्यात 

ओम सद्गुरु दूध संकलन केंद्र या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत संतोष हिंगे व प्रकाश हिंगे या दोन संशयतांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार किती दिवसापासून सुरू आहे. याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे. याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र या दूध संकलन केंद्रावर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात होता; त्यांच्यावर  कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करू लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी काँग्रेसचा प्लॅन? काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधींची आक्रमक भूमिका

लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT