Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप, पतीला रुग्णालयातच दिला चोप

Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालयात नेला असताना महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचे पाहण्यास मिळाले. सदर महिलेने आत्महत्या केली नसून पतीनेच हत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला असून महिलेच्या पतीनेच हत्या केली असल्याचा आरोप करत रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी या पतीला चांगलाच चोप दिला. यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला होता. 

नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांमध्ये संतप्त भावना होत्या. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात नेला असताना याठिकाणी महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातल्याचे पाहण्यास मिळाले. सदर महिलेने आत्महत्या केली नसून पतीनेच हत्या केली असल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. 

मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत 

हत्या केल्याच्या आरोप करत ३ मार्चला दुपारच्या सुमारास महिलेच्या नातेवाईकांनी महिलेच्या पतीला मारहाण करण्यात आली. मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच मारहाण झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांच्या तावडीतून सूडविल्याने पतीच जीव वाचविण्यात आला आहे. 

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

जिल्हा रुग्णालयात ३ मार्चला दुपारच्या सुमारास मारहाणीची घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तरी महिलेने टोकाचा निर्णय कोणत्या कारणाने उचलला याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT