Nashik News Leopard Saam tv
महाराष्ट्र

Leopard Captured : नवले मळा येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Nashik News : नाशिक जवळील पाथर्डी गावातील नवले मळा आणि आजूबाजूच्या परिसरात गेले काही दिवस या बिबट्याचा वावर असल्याने नागरिक देखील दहशतीच्या सावटाखाली होते

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहरालगत असलेल्या पाथर्डी परिसरातील नवले मळा येथे गेल्या अनेक दिवसांपासून (Nashik) धुमाकूळ घालत होता. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान या बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. (Live Marathi News)

नाशिक जवळील पाथर्डी गावातील नवले मळा आणि आजूबाजूच्या परिसरात गेले काही दिवस या बिबट्याचा वावर असल्याने नागरिक देखील दहशतीच्या सावटाखाली होते. तसेच या अगोदर देखील दोन ते तीन बिबट्यानी नागरिकांना दर्शन दिले होते. यातील दोन बिबटे वनविभागाने (Forest Department) बिबट्या लावून जेरबंद केले होते. मात्र पुन्हा काही दिवसांपासून एका बिबट्याचा मळे परिसरात वावर असल्याचे आढळून आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुन्हा बिबट्या आल्याने नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला. वन विभागाले या बिबट्याला सुरक्षितस्थळी हलवले. बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

Maharashtra News Live Update: पुण्यातील चारही धरणे १०० टक्के भरले

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT