Lasalgaon Bajar samiti Saam tv
महाराष्ट्र

Lasalgaon Bajar samiti : शेतीमालाची रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात; लासलगाव बाजार समितीचा निर्णय

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. प्रामुख्याने कांदा विक्री अधिक प्रमाणात असते शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरु केलेल्या डिजिटल प्रणालीचा फायदा

Rajesh Sonwane

अजय सोनवणे
मनमाड (नाशिक)
: बाजार समितीमध्ये माळ विक्री केल्यानंतर अनेकदा त्याचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना फिरवाफिरव केली जात असते. हि रक्कम रोख स्वरूपात देण्यात येते. मात्र आता शेतीमाल विक्री केल्यानंतर मालाची पैसे आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितासाठी एक पाऊल पुढे टाकत हा निर्णय घेतला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. प्रामुख्याने या बाजार समितीमध्ये कांदा विक्री अधिक प्रमाणात असते. या कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने सुरु केलेल्या डिजिटल प्रणालीचा फायदा होणार आहे. अर्थात या ठिकाणी माल विक्री केल्यानंतर लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. 

सॉफ्टवेअर विकसित 
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार तसेच उपबाजार विंचूर व निफाड येथील शेतीमालाच्या लिलावानंतर शेतकऱ्यांना शेतीमालाचे थेट पैसे आता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने डिजिटल प्रणालीद्वारे एक पाऊल पुढे टाकत बनतोश सॉफ्टवेअर विकसित केले आहे. हि प्रक्रिया लवकरच कार्यान्वित केली जाणार असून शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. 

शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल आय कार्ड 
लासलगाव बाजार समितीने डिजिटल प्रणाली सुरु केल्याने याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी नोंदणी करणे क्रम प्राप्त आहे. त्यानंतर त्यांना डिजिटल आय कार्ड मिळणार आहे. या आयकार्डद्वारे शेतकरी त्यांच्या शेतीमालाची विक्री करू शकतील. संपूर्ण लिलावानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तत्काळ त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची केवायसी करून घ्यावी; असे आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT