Girna Dam Saam tv
महाराष्ट्र

Girna Dam : गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग; गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik News : नाशिक शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून धरण ९६ टक्के भरले आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या सर्वात मोठ्या गिरणा धरण ९६ टक्के पाणी साठा झाला असून पाण्याची येणारी आवक पाहता आज दुपारी धरणातून ८१४ क्यूसेक्स पाण्याचे विसर्ग एका वक्राकार दरवाजातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे गिरणा नदीला पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवस झाले जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिकला २ दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नाशिक शहरासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून धरण ९६ टक्के भरले आहे. 

गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून पाटबंधारे उपविभाग चाळीसगांव अंर्तगत असलेल्या गिरणा मोठा प्रकल्प आज ९६.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान गिरणा पाटबंधारे विभागाच्या आदेशान्वये गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता गिरणा प्रकल्पाचे आज गिरणा नदीमध्ये ८१४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 

गंगापूर धरण ९८ टक्के भरले 

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे गंगापूर धरण ९८ टक्के भरले असल्याने पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT