Fighting In Tourist At Pahine waterfall Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: दे दणादण! धबधब्यावर तरूणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Freestyle Fighting In Tourist At Pahine waterfall: नाशिकमध्ये धबधब्यावर पर्यटकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडलीय. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Rohini Gudaghe

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसातील धबधब्यावर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. तरूण धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. यावेळी काही तरुणांनी एकमेकांशी हुल्लडबाजी करत फ्री स्टाइल हाणामारी केल्याचा विडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पहिने परिसरातील धबधब्यावरील असल्याचं सांगितलं जातंय.

सामान्य पर्यटकांना मनस्ताप

काल आषाढी एकादशी आणि मोहरमच्या सुट्टीच्या दिवशी पहिने धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली ( Nashik News) होती. यातील काही तरुणांनी हुल्लडबाजी करत धिंगाणा घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अशा टोळक्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केलीय. हुल्लडबाजांमुळे सामान्य पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

धबधब्यांवर पर्यटकांची हाणामारी

पहीने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे (Viral Video) आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणे आणि गर्दी केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले आहेत. पोलिसांच्या या आदेशाला हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी केराची टोपली दाखवल्याचं समोर आलंय. तरूण बिनधास्तपणे एकमेकांसोबत धिंगाणा घालत आहेत.

व्हिडिओ व्हायरल

पावसाळी पर्यटनात रंगाचा बेरंग झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत (Tourist Fighting Video) आहे. काही हुल्लडबाज तरूण एकमेकांना पाण्यामध्येच धक्काबुक्की करताना दिसत आहेत. तर पाण्याच्या प्रवाहामध्ये एका तरूणाला खाली पाडून मारहाण देखील करत आहेत. काळजाचा ठोका वाढविणारा हा व्हिडिओ (Pahine waterfall Trimbakeshwar) आहे. आरडोओरडा करत एकमेकांना लोटत या तरूणांचा धिंगाणा पाहायला मिळतोय. पर्यटनाच्या ठिकाणी अशा घटनांमुळे अपघात घडण्याचा देखील धोका मोठ्या प्रमाणावर असतो. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT