Malegaon Urdu School Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Urdu School : उर्दु शाळांना बनावट जीआरने मान्यता; मालेगावात ६ शाळांच्या ७४ बनावट तुकड्या

Nashik Malegaon News : मालेगावमधील सहा उर्दु शाळांच्या ७४ तुकड्यांना बनावट जीआरने मान्यता दिल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षण मंडळाची शिफारस नसतांना या तुकड्यांना मान्यता देण्यात आल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मालेगाव (नाशिक)
: शिक्षण विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण नाशिकच्या मालेगावमध्ये बनावट जीआरच्या माध्यमातून उर्दू शाळांना मान्यता दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात ६ उर्दू शाळांमधील ७४ तुकड्यांना बनावट जीआरने मान्यता देण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील सहा उर्दु शाळांच्या ७४ तुकड्यांना बनावट जीआरने मान्यता दिल्याच समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षण मंडळाची शिफारस नसतांना या तुकड्यांना मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शिफारस केलेली नसतांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रव्यवहार करुन ७४ तुकड्यांना मान्यता दिल्याची परिपत्रके पाठवण्यात आली आहे. 

विना अनुदानित तत्वावर ७८ तुकड्याने मान्यता 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय २०१२ हा जीआर अधिकृत दाखवण्यात आला असून यात मालेगाव कार्यक्षेत्रातील सहा व निफाडची एक अशी सात शाळांचा समावेश आहे. या शाळांना कायम विना अनुदानित तत्वावर एकुण ७८ तुकड्यांना मान्यता मिळाली आहे; असे सांगण्यात आले आहे. मुळातच शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर हा जीआर नसल्याने बिंग फुटले आहे.

कोट्यवधी लाटल्याचा संशय 

विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळांना मान्यता दिलेली नसताना जिल्हा परिषदेने परिपत्रक काढून मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तर या सर्व प्रकारात कोट्यवधी रुपये लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता सात शाळांमधील ७८ बनावट तुकड्या समोर आल्या असून जिल्ह्यात हि संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

Panvel : पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ महिलांची सुटका, कस्टमर म्हणून गेले अन्...

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Famous Actress : बिग बॉस फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत घेतले सात फेरे, सुंदर PHOTOS आले समोर

SCROLL FOR NEXT