Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन दिवस राहणार अंधार; मनोरा उभारणीसाठी वीज खंडित

नाशिक शहरासह जिल्ह्यात दोन राहणार दिवस अंधार; मनोरा उभारणीसाठी वीज खंडित

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: महापारेषण कडून मनोरा उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम साधारण दोन दिवस चालणार असून या कामादरम्यान (Nashik) नाशिक शहरातील काही भाग तसेच जिल्ह्यातील काही (Mahapareshan) भागांत दोन दिवस वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. (Latest Marathi News)

महापारेषणकडून अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीच्या कामाकरिता विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापारेषणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. शनिवार व रविवार असे दोन दिवस हे काम चालणार आहे. त्यानुसार शनिवार पहाटे ५ वाजेपासून तर रात्री ८ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित राहणार आहे. मात्र वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या भागात राहणार वीज पुरवठा बंद 
नाशिक शहरातील जेलरोड, दहावा मैल, सिडको, अंबड, पाथर्डी, उपनगर, तपोवन, गणेशवाडी, गंगापूर, मेरी, सातपूर, आडगाव, मखमलाबाद, म्हसरूळ या परिसरात विद्युत पुरवठा बंद राहील. तसेच जिल्ह्यातील सामनगाव, चांदोरी, भगुर, वावी, सिन्नर, दापूर, ओझर, म्हाळसाकोरे, सुकेणे, कोकणगाव, सुरगाणा आणि ३३/११ के. व्ही. उपकेंद्रातून पुरवठा केला जातो तो परिसर बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT