Deputy Tehsildar Arrested In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: नायब तहसीलदाराला अटक, म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

Deputy Tehsildar Arrested In Nashik: नाशिकमध्ये म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • नाशिकमध्ये म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

  • नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक

  • नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केली कारवाई

  • जमीन नोंदीत फेरफार केल्याचा आरोप

अभिजीत सोनावणे, नाशिक

म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. नायब तहसीलदार प्रशासन नितीन पाटील यांना क्राइम ब्रांचने अटक केली. नाशिकच्या गंगापूर रोड येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ४९ पैकी ३१ प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रात त्यांनी फेरफार नोंदी केल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते.

नायब तहसीलदार प्रशासन म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. नितीन पाटील यांना अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नाशिकमधील चर्चेत असलेल्या म्हाडा भूखंड घोटाळ्यातील आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. नायब तहसीलदाराला अटक झाल्यामुळे नाशिकमध्ये चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT