Nashik Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: उपचाराअभावी वृद्धाचा मृत्‍यू; रुग्णालया बाहेर मृतदेह पडून, कर्मचारी संपाचा परिणाम

उपचाराअभावी वृद्धाचा मृत्‍यू; रुग्णालया बाहेर मृतदेह पडून, कर्मचारी संपाचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता हा रुग्णसेवेवर देखील जाणवत आहे. नाशिकच्या (Nashik News) जिल्हा रुग्णालयाच्या अगदी गेट बाहेर एका बेवारस वृद्ध व्यक्तीचा उपचाराभावी मृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे. शरमेची बाब म्हणजे रात्रभर झालेल्या पावसात हा व्यक्ती उपचारासाठी तडफडत मरण पावल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. (Live Marathi News)

मानव जातीला काळिमा फासणारा हा प्रकार असल्‍याचे म्हणावे लागेल. स्‍थानिकांनी याबाबत पोलिसांना आणि काही फुटांवर असलेल्या नाशिक सिव्हील रुग्णालयाला देखील याबाबत कळवण्यात आले होते. तरी देखील कुठलाही प्रतिसाद देण्यात न आल्याचे नागरिकांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा हे वास्तव दाखवले; तेव्हा कुठे संपात सहभागी कर्मचारी यांनी सदर ठिकणी पोहोचून एकाचा मृतदेह आणि एक मृत्यूच्या दारात जाणाऱ्या व्यक्तीला उचलून नेण्यात आले.

अन्‍य एक व्यक्ती मोजतोय शेवटचा श्‍वास

रुग्णालया बाहेर एका व्‍यक्‍तीचा उपचाराअभावी मृत्‍यू झाला. एवढेच नव्हे तर याच मृतदेहापासून काही अंतरावर आणखी एक व्यक्ती गंभीर अवस्थेत शेवटचा श्वास मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे काय? कसा ओळखायचा?

Maharashtra News Live Update: मला एकटं पाडण्याचा सरकारचा कट- मनोज जरांगे

MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचं इन्स्टा अकाऊंट सस्पेंड, पोस्टवर मेटाने मागितलं उत्तर ; पीएम मोदींबद्दल काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT