Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नायलॉन मांजामुळे वृद्धाचे दोन्ही पाय कापले

नायलॉन मांजामुळे वृद्धाचे दोन्ही पाय कापले

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नायलॉन मांजामुळे गोदाघाटावर एका वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केल्याने धोका टळला आहे. मात्र या घटनेने नायलॉन मांजाची विक्री व वापर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (Live Marathi News)

त्र्यंबकेश्वर (Nashik) येथील रहिवासी मदनलाल चंपालाल भुतडा (वय ७०) हे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही पाय अडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र मांजा ओढला गेल्याने मदनलाल भुतडा यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. दोन्ही पाय रक्तबंबाळ झाले.

प्रकृती स्‍थीर

यावेळी परिसरात असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थीर असल्याचे रुग्णालयाने सांगितले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नायलॉन मांजास बंदी असतानाही त्याची चोरीचुप्या मार्गाने विक्री होत आहे. तसेच पतंगप्रेमींकडूनही नायलॉन मांजाला मागणी असल्याचे दिसत असून तेही मांजा वापरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT