Nashik MNS Saam tv
महाराष्ट्र

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nashik News : पक्षातील कार्यकर्ता आपल्या उमेदवाराच्या प्रचारात आहे. मात्र नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फूट पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडत आहे. आठवडाभरातच नाशिकमध्ये मनसेला आणखी धक्का बसला असून माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी भाजप उमेदवाराला पाठींबा दर्शविला आहे. 

विधानसभा निवडणूक आता अंतिम चरणात आहे. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता आपल्या उमेदवाराच्या प्रचारात आहे. मात्र (Nashik) नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत फूट पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मागील आठवड्यातच मनसेचे प्रमुख पदाधिकारी असलेले महापालिकेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पदाचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर मनसेचे (MNS) माजी जिल्हाध्यक्ष व सभागृह नेते दिलीप दातीर यांच्या रूपाने धक्का बसला आहे. 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दिलीप दातीर हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र मनसेने दिलीप दातीर यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. नाराज असलेल्या दिलीप दातीर यांनी भाजप उमेदवार सीमा हिरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप दातीर हे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT