Nashik News Saam Digital
महाराष्ट्र

Nashik News : टोल कर्मचाऱ्यांनी केली अरेरावी; संतप्त नागरिकांनी मालेगाव -कुसुंबा रोडवरील फोडला टोलनाका

Nashik News Update : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे सह परिसरातील संतप्त नागरिकांनी आज मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाका नाका फोडला. टोल नाक्यावरी कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Sandeep Gawade

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे सह परिसरातील संतप्त नागरिकांनी आज मालेगाव कुसुंबा रोडवरील टोलनाका नाका फोडला. टोल नाक्यावरी कर्मचाऱ्याकडून स्थानिकांना अरेरावी केल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व लेनवरील टोल कार्यालय फोडण्यात आले आली आहेत. टोल नाक्यावरी कॉम्पुटर, कॅमेरे यासह साहित्याची तोडफोड केल्यामुळे लाखोंचं नुकसान झालं आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. स्थानिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये यापूर्वीही वाद झाले आहे.

अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी

अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एका स्कार्पिओ गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संपर्कप्रमुख, माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. यात गाडीची आणि वाहनाची तोडफोड करण्यात आली. दरम्यान या मारहाणीत जखमी झालेल्या सचिन जाधव यांची महायुती चे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना सचिन जाधव हे माझे कार्यकर्ते आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही सोबत काम करत आहोत हा राजकीय वाद नसून गैरसमजातून झालेला वाद आहे हा वाद वाढू नये एवढीच अपेक्षा आहे असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू

पाहूनचाराला आलेल्या दोघांचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोलमधील कोंढाळीच्या आलागोंदी गावात घडलीय. जयदेवराव मनोठे (६०) वरून भागवत भोंडवे (५५) अशी मृतांची नावं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT