Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: चाकात लवकर हवा भरून न दिल्याचा राग; मद्यपी तरूणांनी दुकानदारास जीवे मारले

चाकात लवकर हवा भरून न दिल्याचा राग; मद्यपी तरूणांनी दुकानदारास जीवे मारले

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : पंक्‍चर दुकानावर गेल्‍यानंतर गाडीच्‍या चाकात लवकर हवा भरून न दिली नाही. यामुळे मद्यपी (Nashik) तरूणांनी दुकानदारास मारहाण करत जीवे मारल्‍याचा प्रकार समोर आला होता. याबाबत नाशिक आडगाव पोलीस (Police) ठाणे हद्दीत पंक्‍चर दुकानदाराचा खून करणाऱ्या संशयित आरोपींना गुन्हे शाखा १ च्या पथकाने १२ तासाच्या आत अटक केली. (Maharashtra News)

नाशिकच्या औरंगाबाद रोड तपोवन जेजुरकर लॉन्सजवळ असलेल्या पंचर दुकानावर मद्यपी युवक शनिवार (२९ एप्रिल) आले. त्यांनी पंचर दुकानदारास गाडीत हवा भरण्यास सांगितले. त्यानंतर हवा भरण्यास वेळ लागल्याने या मद्यपी ३-४ युवक आणि पंचर दुकानदार यांच्यात वाद होऊन वादाचे पर्यावसन (Crime News) हाणामारीत झाले. मद्यपी युवकांनी पंक्‍चर दुकानदार गुलाम रब्बानी मोहमद याला बेदम मारहाण केली. एकाने त्याच्यावर चॉपरने वार केला. या हल्ल्यात पंक्‍चर दुकानदार गुलाम रब्बानी मोहमद हा ठार झाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले होते.

सीसीटीव्‍हीच्‍या आधारे शोध

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन आजूबाजूच्या सीसीटीव्‍हीच्या आधारे संशयित हल्लेखोरांना मोठ्या शिताफीने बारा तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. द्वारका येथे राहणार यश कैलास पवार, औरंगाबाद रोड येथे राहणारा प्रसाद रामनाथ पवार आणि एक अल्पवयीन बालक असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नाव आहेत. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याचे कबुल केले आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आडगाव पोलीस अधीक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Elections : जिल्हा परिषदेचा धुरळा याच आठवड्यात, संकेत मिळाले, संभाव्य तारीख समोर

Leopard : मुंबईच्या वेशीवर बिबट्याची दहशत, बदलापूरच्या रस्त्यांवर दिसला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Live News Update: भाजप उमेदवारांच्या पहिली यादी शुक्रवारी जाहीर होणार

Nanded: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं अपहरण अन् बेदम मारहाण, अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप; घटनेचा VIDEO समोर

Vangyache Pakode Recipe : बटाटा-कांदा नाही, गरमागरम चहासोबत घ्या वांग्याच्या कुरकुरीत भजींचा आस्वाद

SCROLL FOR NEXT