Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

17 Lakhs of Restricted Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वडाळा (Nashik) गावात पोलिसांनी छापा टाकत सुमारे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) तिघांना अटक केली असून दोघे फरार आहे. (Tajya Batmya)

नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या मोठ्या कारवाईची संपूर्ण वडाळा परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. रोहान अन्वर शेख (वय २८), शोएब इकबाल पटेल (वय ३३), मोहम्मद गुफराण कुतुबुद्दीन खान (वय २२) आणि असद जाकीर सय्यद यांनी १७ लाख १५ हजार ६२५ रुपये किंमतीचा जयका १०००० या कंपनीच्‍या गुटख्‍याचे प्रत्येकी ७५ पुड्यांचे पाकिटे असलेल्या १५२५ किलोग्राम वजनाच्या १०८ गोण्या बाळगल्या. सेंट सादिक शाळा परिसरातील सालार रोहाऊसेसच्या मागील परिसरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

संशयीत जाकीर सय्यद याने नमूद वर्णनाचा व किमतीचा गुटख्याचा माल महाराष्ट्रात बंदी असताना चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने रोहान शेख याच्या मदतीने साठवून ठेवला होता. मात्र पोलिसांनी गोपनीय खबर मिळताच कारवाईच्या भीतीने त्याने मुद्देमाल उघड्यावर फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

Heart disease risk factors: 99% हार्ट अटॅक येण्यामागे हे 4 घटक कारणीभूत; संशोधनातून स्पष्ट

Weekly Horoscope: या राशींसाठी एखादा मोठा निर्णय फायदेशीर ठरेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आईने आधी 3 वर्षाच्या लेकराला संपवले, नंतर स्वतः ही केली आत्महत्या; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 48 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

SCROLL FOR NEXT