Nashik Graduation Election Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठरलं तर! नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा

काही दिवसांपूर्वीच भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Nashik: गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणुकीचे राज्याच्या राजकारणात चांगलेच धुमशान पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता या निवडणुकीत नवा ट्विट आला आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. (Nashik)

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पदवीधर मतदार संघ आता ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपात असलेल्या शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र आता शिवसेनेच्या या निर्णयाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पाठिंबा देणार की, शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीमध्येच वाजणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे सतिश तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र त्यांनी हा फॉर्म न भरता ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT