Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price: कांदा दरात घसरण सुरूच; शेतकऱ्यांनी नांदगावला लिलाव पाडला बंद

Nashik News : नवीन लाल कांदा जास्त दिवस टिकणारा नसतो. त्यातच निर्यात बंदीमुळे ३ ते ३ हजार ५०० रुपये सरासरी मिळणारा भाव कमी होऊन तो निम्म्यावर आला आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कांदा निर्यात बंदी करण्यात आली असल्याने कांदा बाहेर विक्रीसाठी जात नाही. यामुळे मार्केटमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात पडला आहे. यामुळे कांद्याच्या दरात (Onion Price) घसरण सुरु झाली आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. नांदगावमध्ये भाव मिळत नसल्याने (Nashik) शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला आहे. (Live Marathi News)

कांदा निर्यातबंदी लागल्यानंतर कांदा लिलाव सोमवारपासून सुरू झाले. मात्र त्या दिवसापासून नवीन लाल कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली. कांदा निर्यात होत नसल्याने व्यापाऱ्यांनी पाठवलेला कांदा बंदरात पडून आहे, नवीन लाल कांदा जास्त दिवस टिकणारा नसतो. त्यातच निर्यात बंदीमुळे ३ ते ३ हजार ५०० रुपये सरासरी मिळणारा भाव कमी होऊन तो निम्म्यावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी संतप्त असून त्यामुळे निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आपला रोष प्रकट केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांचा रास्ता रोको  
दरम्यान कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. कांद्याला सरासरी १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. लिलावात ५०० रुपयांपासून बोली सुरू कतर जास्तीत जास्त १७०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने नाशिकच्या नांदगावला शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पडले आहेत. यानंतर नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून नांदगाव - येवला रस्त्यावरील बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको आंदोलन केले. यामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, महिलेला परत आणून दिला दागिना

Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

laughter chefs 3: सहा महिन्यांतच 'लाफ्टर शेफ्स'च्या नव्या सीझनची सुरुवात; 'हे' फेमस स्टार्स लावणार कॉमेडीचा तडका

Maharashtra Live News Update: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

SCROLL FOR NEXT