Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: महिनाभरापुर्वी थाटात लग्‍न; संसार फुलण्यापुर्वीच नियतीने केला घात, ट्रॅक्टरखाली दबून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

महिनाभरापुर्वी थाटात लग्‍न; संसार फुलण्यापुर्वीच नियतीने केला घात, ट्रॅक्टरखाली दबून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असतांना ट्रॅक्टर पलटी होऊन तरुण शेतकऱ्याचा (Farmer) जागीच मृत्यू झाला. सदरची घटना (Nashik) नाशिकच्या देवळा तालूक्यातील खामखेडा येथे घडली. राकेश धोंडगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. (Breaking Marathi News)

राकेश हा ट्रॅक्टर घेवून दुसऱ्याच्या शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात होता. या दरम्‍यान रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीचा अंदाज न आल्‍याने चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाले. त्या खाली राकेश दबला गेल्‍याने त्यात त्याचा जागीट मृत्यू झाला. ही घटना समजताच आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी धाव घेत राकेश याला बाहेर काढून त्याला देवळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

महिनाभरापुर्वीच झाले लग्‍न

विशेष म्हणजे राकेश धोंडगे याचे महिनाभरापुर्वीच लग्न झाले होते. संसाराला सुरवात झाली असताना नियतीने घात केला अन्‌ राकेशचा अपघाती मृत्‍यू झाला. त्याच्‍या मृत्‍यूमुळे सर्व गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात दमदार एण्ट्री; नव्या मालिकेत साकारणार 'ही' खास भूमिका

Hartalika Vrat 2025 : हरतालिका व्रत का केला जातो? जाणून घ्या पौराणिक कथा

भारतातील 'या' जागा आहे भयानक; येतात विचित्र आवाज

Maharashtra Live News Update: जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ

SCROLL FOR NEXT