Nashik Crime Saam Tv
महाराष्ट्र

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; शेतीच्या वादातून त्याने चक्क मोठ्या भावाला संपवलं

ही भयंकर घटना गुरूवारी जलालपूर शिवारात घडली.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नाशिक तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात टिकाव मारत त्याची हत्या केली. ही भयंकर घटना गुरूवारी जलालपूर शिवारात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लहान भावाला अटक केली असून अन्य चौघे संशयित पसार झाले आहेत. (Nashik Crime News)

बळवंत कोंडाजी शेळके (वय ५७, रा. यशवंत नगर, मुंगसरा) असे मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. एकत्रित शेतीवरून बळवंत व त्यांचा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (६०) यांच्यात वाद होते. गुरुवारी याच वादातून दोन्ही भावांमध्ये हाणामारी झाली. त्यात बळवंत यांच्यावर श्रीहरी यांच्यासह त्यांचा मुलगा जयदीप श्रीहरी शेळके (३५) यांनी हल्ला करीत टिकाव डोक्यात टाकला.

या घटनेत बळवंत यांना गंभीर जखम झाली. बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय व भाऊ यशवंत शेळके यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी हल्लेखोर पुतण्या जयदीप यास ताब्यात घेतले असून श्रीहरी व त्यांची पत्नी हे जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT