Nashik News
Nashik News Saam TV
महाराष्ट्र

नाशिक पदवीधर निवडणुकीतील ट्विस्ट संपेना; भाजप- शिंदे गट छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला पाठिंबा देणार?

अभिजीत सोनावणे

Nashik Vidhan Parishad: नाशिक पदवीधर निवडणुकीतील ट्विस्ट संपायचं नाव घेत नाहीये. नाशिक पदवीधर मतदारसंघात पुन्हा नवीन ट्विस्ट येण्याची चिन्हं आहेत.कारण भाजप आणि शिंदे गटाचा आम्हालाच पाठिंबा मिळणार आहे, असा दावा स्वराज्य संघटनेने केला आहे. त्यामुळे दुहेरी वाटत असणारी निवडणूक तिहेरी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संभाजीराजे छत्रपतींच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी बोलणी सुरू आहे. पदवीधर निवडणुकीसाठी स्वतः संभाजीराजे २८ तारखेला नाशकात दाखल होणार आहेत.२८ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये सुरु असलेल्या खलबतांवरुन सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.  (Latest Marathi News)

येत्या दोन दिवसांत नाशिक पदवीधर निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट येणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाने अजूनपर्यंत कुणालाही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. दरम्यान स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार आणि स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या समीकरणांची चर्चा येथे सुरु झाली आहे.

नाशिक पदवीधरसाठी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने टक्कर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोघांनीही प्रचारासाठी कंबर कसली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईमध्ये राज ठाकरेंचा रोड शो होणार?

EPFO Auto Claim : EPFOचा नागरिकांना मोठा दिलासा; घर, लग्न, आजारपणासाठी करता येणार ऑटो क्लेम

Who Is Vaibhav Kale: इस्त्रायल-हमास युद्धात शहीद झालेले भारतीय लष्करी अधिकारी वैभव काळे कोण होते? देशाची २२ वर्ष केली होती सेवा

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमतरता असल्यास 'ही' लक्षणे दिसून येतील

SCROLL FOR NEXT