नाशिक हादरले! काडीपेटी पेटवणे पडले महागात; 6 कामगार जखमी Saam Tv
महाराष्ट्र

नाशिक हादरले! काडीपेटी पेटवणे पडले महागात; 6 कामगार जखमी

नाशिक जिल्हा गॅस सिलिंडरच्या स्फोटाने हादरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : नाशिक Nashik जिल्हा गॅस सिलिंडरच्या gas cylinder स्फोटाने हादरले आहे. या स्फोटात ६ कामगार जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक जिल्ह्यामधील कुमावतनगरमध्ये या ठिकाणी घडली आहे. स्वयंपाक करण्यासाठी गॅस सुरु करताना, काडीपेटी पेटवल्यावर गॅसचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ६ कामगार भाजले आहेत. यातील २ कामगार ९० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार होत आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, ६ कामगार कुमावतनगरमध्ये एकत्रित राहत होते. हे सर्व कामगार परराज्यातले असून, टाइल्स बसवण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळी स्वयंपाक करण्याकरिता गॅस सुरु करत होते. त्यावेळी त्यांच्यातले एकाने काडीपेटीची काडी पेटवली. त्याचवेळी गॅस सिलिंडरचा भडका उडला आणि मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट होताच संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

या स्फोटात लवलेश धरम पाल (रा. अदालतपूर, उत्तर प्रदेश), अखिलेख धरमपाल, विजयपाल फत्तेपूर, संजय मौर्य, अरविंद पाल, वीरेंद्रकुमार सर्वजण रा. फतेहपूर, उत्तर प्रदेश येथील आहेत. हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यामधील २ कामगार ९० टक्के भाजले आहेत. या स्फोटाप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अभिनेता सोनू सूद साईचरणी नतमस्तक

Rain Alert : पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये 'उन्हाळ्यात पावसाळा'; महाराष्ट्रात कसं असेल हवामान?

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

Hair Oiling Tips: ओल्या केसांवर तेल कधी लावावे?

Pune Crime: आईच्या मित्राकडून १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, शाळेत सोडतो म्हणत कारमध्ये बसलवं नंतर...; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT