nashik rain  saam tv
महाराष्ट्र

नाशकात मुसळधार, गोदापत्रातून गायीसह दाेन घाेड्यांचा आपत्ती व्यवस्थापनानं जीव वाचविला

पथकानं बोट नदी पात्रात घेऊन जाऊन गोमातेला बोटेच्या साह्याने बाहेर काढलं.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Rain Update : नाशिक येथे बुधवार रात्रीपासून आज (गुरुवार) पहाटे पर्यंत मुसळधार पाऊस (rain) झाला. या पावसामुळं गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान पूराच्या पाण्यात वाहून गेलेली एक गाय आणि दाेन घाेड्यांना वाचविण्यात आपत्ती व्यवस्थापन विभागास यश आलं आहे.

धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गोदावरी धरणातून सकाळी दहा वाजेला चार हजार क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आला. त्यामुळे गोदाकाठी असलेले मंदिरे पाण्याखाली गेले हाेते. गोदाकाठी असलेले नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कच्या इशारा देण्यात आला हाेता. दरम्यान आज दुपारी तीन वाजता सहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

नाशिक येथे 66 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळं परिसरातील नदी नाले भरुन वाहू लागले आहेत. गंगापूर धरण हे देखील नव्वद टक्के भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान नाशिकच्या गोदापात्रात अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एक गाय आणि दोन घोडे गेले हाेते.

ही गाय आणि दोन घोडे सायखेडा गोदापत्राच्या काठी पाण्यामध्ये बुडताना किसन जाधव यांना दिसले. त्यांनी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख सागर गडाख यांना फोनद्वारे कळवले. त्यांनी तात्काळ विलास सूर्यवंशी, फकीरा धुळे, बाळू आंबेकर, किरण वाघ, कृष्णा धोंडगे, अजय चारुस्कर, वैभव जमदाडे आदी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान पथकानं बोट नदी पात्रात घेऊन जाऊन गोमातेला बोटेच्या साह्याने बाहेर काढलं. तसेच त्या घोड्यांना देखील बोटीत टाकून बाहेर काढले. आपत्ती व्यवस्थापनाच्या अथक परिश्रमामुळे पाण्याच्या बाहेर दाेन्ही प्राण्यांना काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT