Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News: नाशिक हादरले! लहान भावाकडून मोठ्या भावाची निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

Nashik Gopal Chouk Crime: कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे..

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik Kamtevade Crime: कौटुंबिक वादातून लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदाशिव दामू निकम असे मृताचे नाव असून नाशिकच्या कामटवाडे परिसरातील गोपाल चौक येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी हरी दामू निकम (वय, 50) हा गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मद्यपान करून घरी आला. यावेळी त्याने मोठा भाऊ सदाशिव दामू निकम वय 55 यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यामुळेच सदाशिव निकम यांनी त्याचा जाब विचारला असता हरी दामू निकम याने त्यांच्यावर हल्ला केला.

आरोपीने आपल्या सख्या मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत सदाशिव निकम हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. (Nashik News)

दरम्यान घटनेची माहिती करताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी फिर्यादी बायडी कैलास सूर्यवंशी यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हरी दामू निकम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT