Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime News: भरधाव कारची तीन वाहनांना धडक; गाडीत आढळलेल्या 'त्या' गोष्टीमुळे खळबळ

पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, एका अपघातग्रस्त कारमध्ये असं काही आढळलं, जे पाहून पोलीसही थक्क झाले

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालकांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, एका अपघातग्रस्त कारमध्ये असं काही आढळलं, जे पाहून पोलीसही थक्क झाले. (Latest Marathi News)

अपघातग्रस्त कारमध्ये काय होतं?

प्राप्त माहितीनुसार, उंटवाडी अंबड पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत बुधवारी तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.(Nashik Crime News)

पोलिसांनी तीनही अपघाग्रस्त वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये एक कारचालक हा मध्यधुंद अवस्थेत आढळला. या कारमध्ये मागच्या बाजूला एक बँगही आढळली. पोलिसांनी ही बँग उघडताच, त्यामध्ये कोट्यावधी रुपये असल्याचं लक्षात आलं.

पोलिसांनी तत्काळ कारचालकासह कार पोलीस ठाण्यात आणली. पोलिसांनी बँगमधील नोटांची तपासणी केली असता, त्या नोटा नकली असल्याचे समोर आले आहे. त्यात 500 आणि 2000 च्या नकली नोटा सापडल्या आहे.

दरम्यान, ही रोकड कुठून आली कुणाची आहे. याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. मद्यधुंद कारचालक हा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT