Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: ओझरमध्‍ये युवकाची हत्‍या; नाशिकमध्‍ये तरुणाचे अपहरण करून मारहाण

ओझरमध्‍ये युवकाची हत्‍या; नाशिकमध्‍ये तरुणाचे अपहरण करून मारहाण

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिक शहर व परिसरात क्राईमच्‍या दोन घटना घडल्‍या आहेत. यात ओझरमध्‍ये रात्रीच्‍या सुमारास युवकाची हत्‍या झाली आहे. तर लासलगाव बसस्‍थानक परिसरातून तरुणाचे अपहरण करून त्‍यास मारहाण केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

नाशिकच्‍या ओझरला प्रमोद निकाळजे (वय ३२) नामक युवकाची रात्री हत्‍या (Crime News) करण्यात आली. ओझरच्‍या आंबेडकरनगर परिसरात घटना घडली आहे. प्रमोद हा मनमिळाऊ असल्‍याने त्‍याच्‍या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

तरुणाचे अपहरण करून मारहाण

नाशिकच्या लासलगाव बस स्थानकातून मुलीच्या प्रकरणावरुन गणेश माळी या तरुणाला नातेवाईक अनिल माळी याने मारहाण केली होती. या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी गणेश माळीने अनिल यास लासलगाव बसस्थानक परिसरात बोलविले. यानंतर अन्य मित्रांच्या मदतीने त्याचे गाडीतून अपहरण करुन त्यास रेल्वे गेटजवळील काटेरी झुडपात नेत मारहाण केली. बसस्थानकातून गाडीतून नेत गाडी मागे त्याचे साथीदार पळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. याबाबत लासलगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT