Nashik Crime Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime: विहितगावमध्ये माथेफिरू तरुणांचा धुडगूस! वाहनांवर कोयत्याने हल्ला, दुचाकी जाळल्या; परिसरात भितीचं वातावरण

Nashik Latest News: सोसायटीमधील गाड्या जाळल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Crime News: गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर परिसरात गंभीर गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिकच्या विहितगावमधून असाच प्रकार उघडकीस आला असून हातात कोयता घेवून २ माथेफिरुंनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Crime News in Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, विहितगावमध्ये मध्यरात्री २ माथेफिरू तरुणांनी धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हातात कोयता घेवून रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर कोयत्याने मारत दोघांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

तसेच या दोघांनी एका सोसायटीच्या पार्किंगमधील दुचाकी जाळल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोसायटीमधील गाड्या जाळल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मनमाडच्या सटाणे येथे दोन गटात तुफान राडा

मनमाडजवळ (Manmad) असलेल्या सटाणे गावात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकमेकांवर लाठ्या काठ्यानी हल्ला केला त्यात एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी 8 जणावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT