Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : चोरट्यांनी थेट एटीएमच मशीन नेले चोरून; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

चोरट्यांनी थेट एटीएमच मशीन नेले चोरून; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Rajesh Sonwane

तबरेज शेख

नाशिक : नाशिकरोड भागातील सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटर (Nashik) असून या सेंटर जवळच एसबीआय बँकेचे एटीएम (ATM) आहे. या ठिकाणी मध्यरात्रीनंतर चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी होत नसल्याने चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडलीये. ही संपूर्ण घटना (CCTV) सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. (Latest Marathi News)

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट असतो. त्यामुळे या संधीचा फायदा घेत सामनगाव रोड परिसरात असलेल्या आरपीएफ सेंटर जवळील एटीएमच चोरट्यांनी चोरून नेले आहे. सदरची घटना सकाळी नागरिकांना समजताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने नाशिकरोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्‍ही फुटेजच्‍या आधारे तपास सुरू

तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये एक पिकअप व स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून या एटीएममध्ये किती रक्कम होती याबाबत अद्याप निश्चित आकडा समजू शकलेला नाही. मात्र एटीएम चोरणाऱ्या संशयतांचा पोलीस शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT