Nashik Crime News Son in law killed her brother in law Nandgaon anand nagar area shocking incident Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime: कौटुंबिक वाद विकोपाला! दाजीने हातोडीने वार करत मेहुण्याला संपवलं; धक्कादायक घटनेनं खळबळ

Nashik Crime News: मेहुणा दारू पिऊन आपल्या आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या रागातून एका दाजीने त्याची हातोडीने वार करत हत्या केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे, साम टीव्ही

Nashik Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून अनेक ठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुणा दारू पिऊन आपल्या आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या रागातून एका दाजीने त्याची हातोडीने वार करत हत्या केली आहे.  (Breaking Marathi News)

नाशिकच्या नांदगावमधील आनंदनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. वाल्मिक राठोड असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत ईश्वर ठाकूर यास ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक राठोड या तरुणास (Nashik News) दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन घरी आई वडिलांना त्रास देत होता. यामुळे वाल्मिकची बहिण आणि त्याचे दाजी कायम टेन्शनमध्ये असायचे. दोघांनी अनेकदा त्याला दारू न पिण्याचा सल्ला दिला. परंतू वाल्मिकने तिचे ऐकले नाही.

दरम्यान, बुधवारी (१७ मे) वाल्मिक पुन्हा घरी दारू पिऊन आला. त्याने नेहमीप्रमाणे आई-वडिलांना त्रास (Crime News) देण्यास सुरूवात केली. याची माहिती वाल्मिकच्या दाजीला कळाली. मेहुणा सांगून सुद्धा आपलं ऐकत नसल्याने ईश्वर ठाकूर यांना राग अनावर झाला.

ईश्वरने तातडीने वाल्मिकचे घर गाठले आणि त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यादरम्यान दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यात ईश्वरने घरात पडलेली हातोडी उचलली आणि थेट वाल्मिकच्या हातावर आणि पायावर वार केले. यातील एक वार वाल्मिकच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत वाल्मिकचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तर गुन्ह्यातील आरोपी ईश्वर ठाकूर याला ताब्यात घेतले. कौटुंबिक वादातून दाजीनेच मेव्हण्याची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Monalisa Wedding : मोनालिसानं फरमानसोबत पळून जाऊन केलं लग्न, कुंभमेळ्यामुळे रातोरात झाली होती प्रसिद्ध

Grapes Cleaning: तुम्ही द्राक्षे धुवून लगेच खाताय का? व्यवस्थित स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

SCROLL FOR NEXT