nashik news  saam tv
महाराष्ट्र

Nashik : शासकीय रुग्णालयात काळाबाजार; पोलीस कर्मचाऱ्यांकडून बदल्यांसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर

नाशिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik Crime news : नाशिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तालुका पोलीस ठाण्यात ग्रामीण पोलीस दलातील एका महिला वरिष्ठ लिपीक आणि जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मॅनला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात नाशिक (Nashik) आणि धुळे येथील तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्यचिकिस्तकांचे नावे समोर आले आहे. सदर प्रकरणात नाव समोर आल्यामुळे दोन अतिरिक्त शल्यचिकित्सक कारवाईच्या भीतीने नॉटरिचेबल झाले आहेत.

पोलीसांनी दिलेली माहिती आणि ग्रामीण प्रशासनाने निरिक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रशासकीय कार्यालयातील मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या शिपायाचा नाशिक ग्रामीण दलात बदली करण्यासाठी अर्ज आला होता. याअर्जासोबत जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले होते. पोलीस शिपायाच्या नमुद आजाराबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सदर वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी केली असता जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले. चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि चौकशीत तत्कालीन सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्या सह्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, प्रमाणपत्र रुग्णालयाचा लिफ्टमॅनने बनवून देत त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्याचे समोर आले आहे. तालुका पोलिसांनी संशय लिपीक हिरा कनोज यांना पाच दिवसांपूर्वी अटक केली. तर सिव्हिलचे कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर घटनेने आरोग्य एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT